- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी गडचिरोली तालुक्यातील लांझेडा,अडपल्ली,गोगाव,महादवाडी, काटली,मोहझरी पॅच आणि साखरा या सात गावांमधील खाजगी जमिनींची थेट खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.आज,बुधवार ३० एप्रिलला या प्रकल्पाअंतर्गत काही शेतकऱ्यांची रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण झाली असून,त्यांना भूसंपादनाची रक्कम गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि विशेष भूसंपादन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वितरित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की,संबंधित सात गावांतील सर्व भूधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयात उपस्थित राहून तात्काळ रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून प्रकल्पास गती मिळू शकेल.
- Advertisement -

