उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- प्रादेशिक हवामान विज्ञान खाते केंद्र नागपूर यांनी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आणखी पुढील दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा व वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना व बहुदा सर्वत्र तर काही ठिकाणी हलक्या-मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची संभावना वर्तविण्यात आली आहे.
सहा ही जिल्ह्यात उद्या २८ जून ते २९ जून २०२३ रोजी दोन दिवस पावसाचे यलो अलर्ट घोषित करण्यात आले असून ३० जून ते १ जुलै रोजी रोजी पाऊस पडणार नसल्याची संभावना प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे.