उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- १. वैनगंगा नदी : गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी १७ गेट ०.५० मी.ने उघडलेले असुन २,०२२ क्युमेक्स (७१,४०६ क्युसेक्स) विसर्ग आहे.
चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग ९८८६ क्युमेक्स (३,४९,१२४ क्युसेक्स) आहे.
वडसा व वाघोली या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर असुन धोका पातळीच्या 0.35 मी.ने खाली आहे.
२.वर्धा नदी : निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३१ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
३.प्राणहिता नदी : दिना प्रकल्प १०० टक्के भरलेला असून सांडव्यावरुन ४५ क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
४.गोदावरी नदी : श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६२ पैकी ६२ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ३५ गेट उघडलेले असुन विसर्ग ८,२९३ क्युमेक्स (२,९२,८५० क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी ९८.७० मी.असुन पूर्ण संचय पातळीच्या २.३० मी.ने खाली आहे.बॅरेजमध्ये येवा वाढत असल्याने बॅरेजचे पुन्हा ११ गेट उघडण्यात येणार असुन विसर्ग ९,९११ क्युमेक्स (३,५०,००० क्युसेक्स) पर्यंत वाढविण्यात येणार आहे. नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
५. इंद्रावती नदी : जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पुलाच्या पातळीच्या वर आहे.
इशारा : नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक तसेच वैनगंगा, प्राणहिता,वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे.नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.
हवामान संदेश : भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे दिनांक १८ जुलै २०२३ रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता,वर्धा,इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील काही भागात आजही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे.कृपया उचित दक्षता घ्यावी;असे आवाहन करण्यात आले आहे.