उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- अखिल भारतीय श्री.गुरूदेव सेवा मंडळ,गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार समितीच्या झालेल्या सभेत गुरुदेव सेवा मंडळ आमगाव(वडसा) चे अध्यक्ष विनोद जक्कनवार यांची गडचिरोली जिल्हा प्रचार प्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे.
श्री.गुरुदेव केंद्रीय प्रचार विभाग समिती अधिकारात झालेल्या सभेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत प्रचार विभाग समितीच्या वतीने आयोजित सभेमध्ये झक्कानवार यांची निवड झाली आहे.
निवडीच्या कार्यकाळात झक्कानवार यांनी समितीला सामोरे नेण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करावे व प्रचारास अधिक गती मिळावी अशी अपेक्षा श्री.गुरुदेव केंद्रीय प्रचार विभाग समितीच्या मान्यवरांतर्फे करण्यात आली आहे.