उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.२ मार्च २०२३ पासुन इयत्ता १० वी ची परीक्षा सुरु आहे.३० मार्च २०२३ रोजी श्रीराम नवमी व ४ एप्रिल २०२३ रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येत आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा,मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये; तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात २२ मार्च २०२३ चे ००.१ वा ते ५ एप्रिल २०२३ चे २४ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५२ चे कलम ३७(१) (३) संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे.असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.