Tuesday, September 8, 2026
Homeकुरखेडाखोब्रामेंढा देवस्थान परिसरात होणार दमा व इतर आजारांवर मोफत औषधीचे वाटप..

खोब्रामेंढा देवस्थान परिसरात होणार दमा व इतर आजारांवर मोफत औषधीचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-दरवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्र दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र हनुमान देवस्थान,खोब्रामेंढा येथे  भव्य मोफत दमा व इतर आजारांवर औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी येत्या,सोमवार ८ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता औषधी वाटपाला प्रारंभ होणार असून मंगळवार ९ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.या कालावधीत येणाऱ्या  सर्व नागरिकांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत औषधींचे वितरण करण्यात येणार आहे.
औषधींचा लाभ विशेषतः दमा,मिरगी,मुतखडा, कॅन्सर आदी विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मिळणार असून निरोगी व्यक्तीदेखील भविष्यातील आरोग्य संवर्धनासाठी या औषधींचा लाभ घेऊ शकतात.ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या शिबिराचा वर्षानुवर्षे फायदा झाल्याचे अनुभव सांगितले जातात.
याशिवाय,कोणत्याही प्रकारचा सर्पदंश झाल्यास संबंधित व्यक्तीचे नाव व माहिती तात्काळ खालील मोबाईल क्रमांकांवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : 
7588364987
9405815467
या उपक्रमाचे मार्गदर्शक व परिचयकार भक्तदास नरुले महाराज असून,त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनसेवेचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे.परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत जणसेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
  • स्थळ👇
श्री क्षेत्र हनुमान देवस्थान,खोब्रामेंढा,
ता.कुरखेडा,जि.गडचिरोली
विशेष सूचना: खोब्रामेंढा हे गाव मालेवाडा येथून पूर्वेस सुमारे १० कि.मी. अंतरावर असून भाविक व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या जनकल्याणकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!