Tuesday, March 25, 2025
Homeगडचिरोलीखड्डा चुकवितांना तरुणाचे जीव गमावलेल्या कुटुंबीयांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा….!
spot_img

खड्डा चुकवितांना तरुणाचे जीव गमावलेल्या कुटुंबीयांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा….!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील कढोली मार्गे जाणाऱ्या घाटी गावानजीक मुख्य डांबरीकरण रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.खड्डा चुकविण्याच्या नादात आरमोरी तालुक्याच्या कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या नेताजी बालाजी गेडाम वय ३७ वर्षे यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने मंगळवारी दिनांक-१७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्रौ ८ वाजेच्या सुमारास त्यांचा अपघात झाला व ते रस्त्यावर पडले असता;त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.त्यांना वेळीच कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून खड्डा चुकवितांना तरुणाचे जीव गमावलेल्या कुटुंबीयांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा…! अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यत्वे म्हणजे,आपण नेहमीच बघत असतो की,एखादे वेळेस वाघ,वाघीण वा इतर हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला चढविला तर आपण मोर्चे वा इतर आंदोलने करून नुकसानभरपाई मागत असतो; मात्र एखादेवेळी मुख्य रस्त्यांवरील वा इतर ठिकाणांतील खड्ड्यांमुळे वा गतीरोधकांमुळे एखाद्या इसमाचा नाहक विनाकारण बळी गेल्यास त्यासाठी आपण चुप्पी साधून नशिबास दोष देऊन स्वतःला नेहमीच कोसत असतो.रेल्वे अपघातात एखादा प्रवासी जखमी वा मृत्यू पावल्यास रेल्वे प्रशासनास सुध्दा धारेवर धरून कोर्टातील पायऱ्या चढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असतोच.अशाच प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपलीच पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे.मुख्य डांबरीकरण मार्गावरील खड्डे न बुजविनाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे काम असो वा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असो; नाहीतर रस्त्याचे काम पूर्णत्वास आणणाऱ्या कंत्राटदाराचे काम असो; अशांवर कर्तव्यात कसूर वा कामात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अन्यथा चालढकल कामे करून परत एखाद्या सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी पडल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!