Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन….

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-  आजच्या तरुण- तरुणींना शिक्षणासोबतच कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १२ केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. 

यात विसोरा,असरअली,गेदा,मुरुमगाव,पोर्ला,आष्टी, कढोली,वैरागड,सुंदरनगर,कोटगुल,आरेवाडा आणि आलापल्ली येथील ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे.वैरागड येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते उपस्थित होते.तर पोर्ला येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मिना,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.तसेच वैरागड येथे जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, आरमोरीचे तहसीलदार श्री.माने यांच्यासह वैरागडचे सरपंच,उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले,जगात भारतातील कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांची मागणी वाढली आहे.बांधकाम, आरोग्य,पर्यटन,शिक्षण,वाहतूक व संदर्भीय सेवा या क्षेत्रात विशेष मागणी आहे.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण तरूणी रोजगाराभिमुख प्रशिक्षित होतील.महाराष्ट्रात बांधकाम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठे काम असल्यामुळे भविष्यातही अनेक केंद्र स्थापन होणार आहेत.महाराष्ट्र सरकारने लघु प्रशिक्षणाकडेसुध्दा लक्ष केंद्रीत करावे.त्यासाठी प्रशिक्षणाचे ऑनलाईन सत्र आयोजित करावे. प्रशिक्षित लोकांना उद्योगांचे प्रथम प्राधान्य असते. भारतात केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून वेगळे बजेट त्यासाठी दिले आहे. कौशल्य विकासाचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबांना होतो.केंद्र सरकारने पी.एम.विश्वकर्मा योजना सुरू केली असून यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.राज्यातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातून ही योजना पुढे जाणार असल्याचेही पंतप्रधान यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!