देसाईगंज :- शॅडो पंचायत कोंढाळा यांच्या वतीने नियमित शैक्षणिक,क्रिडा व सामाजिक विषयांवर गावातील तरूण,तुरूणींना मार्गदर्शन करण्याकरीता वेगवेगळ्या क्षेत्रातील मार्गदर्शक व प्रेरणादायक व्यक्तिमत्वांना आमंत्रित केले जाते.त्यांचा प्रवास,त्यांचे मार्गदर्शन आणि त्याच्या अनुभव कथनातून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता यावे सोबतच पुस्तकापलीकडचे ज्ञान आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावाबाहेरील विश्व ही बघता यावे,त्यांच्या स्वप्नांना पंख मिळावेत ह्या सर्व हेतूने व विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा उपयोग त्यांच्या साठी त्यांच्या परिवारासाठी, समाजासाठी व देशासाठी व्हावा या उद्देशाने असे उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मकर संक्रांतिचे औचित्य साधून,नदिवर स्वच्छता, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व आपदा मित्र जानिव जागृती अश्या तीन उद्देशाने शॅडो पंचायत कोंढाळातर्फे कार्यक्रम आयोजित केले होते.सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देसाईगंज पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे व स्वाती चंदनखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वेळेचा सदुपयोग करावा व जास्तीत जास्त वाचन आणि समाज मध्यामावरील वावर कमी असावा व ध्येय ठरवावे आणि त्यानुसार वाटचाल करावी. सोबतच,आयुष्य समजून घेतांना या विषयांवर सुद्धा बोलत होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजून घेता मोठी स्वप्ने पहावीत.इच्छाशक्ती व मेहणतीच्या बळावर ते मीळवले जाऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुठलेही काम करतांना त्यात आपले शंभर टक्के आत्मीयता द्यावी.यश आपल्याकडे धावत येईल. त्यासाठी आपल्याला आधी त्याचा पात्र होता आलं पाहिजे.ती पात्रता आपल्या अंगी असली तर जग त्या क्षेत्रासाठी आपला शोध घेतो.मात्र आपल्याला आधी स्वतःला शोधून ध्येय्य निश्चित करत आपले कष्ट त्या दिशेने घ्यावे लागतील… असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोबतच चंदणखेडे यांनी सुद्धा आपला प्रवास सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,मनात कुठल्याही पद्धतीचे न्यूनगंड न बाडगता आपल्या ध्येय्याशी एकनीष्ट राहुण प्रामाणिक मेहनत घ्यावी यश नक्की मीळतं असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमानंतर संक्राती निमित्ताने नदिवर स्वच्छता करण्यात आली व नदिवीषयी आणि स्वच्छतेविषयी जाणिवजागृती करण्यात आली. उपक्रमात शॅडो पंचायतीचे मार्गदर्शक कोंढाळा गावातील सरपंच अपर्णाताई राऊत व बाबाराॅय भोसले पाणि व्ययवस्थापण मुंबई विद्यापीठ तालूका समन्यवयक मुल, सोबतच शॅडोचे सर्व स्वयंसेवक आणि पोलीस भरतीची तयारी करणारे तरूण तरूणी उपस्थीतत होते.