Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन

गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वॉकेथॉनचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गडचिरोली :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने १६ जानेवारी २०२३ रोजी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत विविध कार्यक्रम करुन राबविण्यात येत आहे.सदर वॉकेथॉन आय.टी.आय.चौक ते कोर्ट चौक वरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सांगता करण्यात आली व सर्वांना रस्ता सुरक्षेपर शपथ देण्यात आली.

वॉकेथॉनप्रसंगी पोलीस विभाग,वाहतुक शाखा व गडचिरोली येथील सहा.पोलीस निरीक्षक पूनम गोरे संपूर्ण टिमसह उपस्थित होत्या.तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील शिक्षक भास्कर मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली २०० प्रशिक्षणार्थी व शिक्षक उपस्थित होते.वॉकेथॉनमध्ये मोटार वाहन निरीक्षक वैष्णवी दिघावकर,सहा.मोटार वाहन निरीक्षक एच.डब्ल्यू.गावंडे,सहा.मोटार वाहन निरीक्षक के.एस.पारखी,सहा.मोटार वाहन निरीक्षक एच. सी.काळे,सहा.मोटार वाहन निरीक्षक जी.एच. खराबे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल बदखल यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!