Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरक्षुल्लक कारणावरून पोलिसांना मारहाण करीत दारुड्यांनी एका पोलिसाची केली हत्या..!

क्षुल्लक कारणावरून पोलिसांना मारहाण करीत दारुड्यांनी एका पोलिसाची केली हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीची मोठी झलक उघडकीस आली आहे.एका बारमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन पोलिसांना मारहाण करून दारुड्यांनी एका पोलिसाची हत्या केल्याची घटना काल शुक्रवारी ७ मार्चच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.सदरची घटना चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा मार्गावरील पिंक बार अँड रेस्टॉरंट बारमध्ये घडली.दिलीप चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर संदीप चाफले गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
माहितीनुसार,पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व संदिप चाफले कर्तव्य बजावून झाल्यानंतर चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा मार्गावरील पिंक बार अँड रेस्टॉरंट बारमध्ये काल शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गेले होते.बारमध्ये गेल्यानंतर गुंड प्रवृत्तीचे दोघेजण दारूच्या नशेत मोठ-मोठ्याने आवाज करीत होते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मोठ्याने आवाज न करण्याचा सल्ला दिला.गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे न ऐकता दारूच्या नशेत उलट आपल्या चार ते पाच सहकाऱ्यांना बोलावून पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व संदिप चाफले यांच्यावर चाकूने हल्ला चढवून सपासप वार केले.यात दोन्ही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.दोघांनाही रुग्णालयात नेत असतांना पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा वाटेतच मृत्यू झाला तर संदिप चाफले यांना सामान्य रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.सदर घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी आकाश शिर्के,मल्लिक व इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर पिंक बारचे संचालक बनकर यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!