Monday, May 18, 2026
Homeपुणेक्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून क्षुल्लकशा कारणासाठी बापाने पोटच्या नऊ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब आज मंगळवारी समोर आली आहे.हैवान बाप एवढ्यावरच थांबला नाही तर मुलीची हत्या केल्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने  मुलीचे मृतदेह कापडात गुंडाळले व घराला आग लावून अपघात भासवण्याचा प्रयत्न केला.यात प्रत्यक्षदर्शी महिलेचाही समावेश असल्याने दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे गावातील हनुमान वस्तीत घडली.शांताराम दुर्योधन चव्हाण वय ३३ वर्षे, रा.हनुमान वस्ती,देऊळगाव राजे, ता.दौंड,जि.पुणे असे हैवान आरोपी पित्याचे नाव आहे, तर अनामिका शांताराम चव्हाण वय ९ वर्षे असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.
नऊ वर्षीय अनामिकाने तिचा भाऊ संस्कार याच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केली होती.सदरची बाब तिच्या वडिलांना कळली.याचा राग मनात धरून आरोपी शांतारामने लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीच्या गळ्यावर,डोक्यावर आणि शरीरावर वार केले.यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.घटनेवेळी चिंगु शिंदबाद भोसले ही महिला उपस्थित असतांनाही तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.अश्यातच आरोपीने घराला आग लावून प्रकरण भटकविण्याचा प्रयत्न केला.प्रकरणी दौंड पोलिसांनी पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ अंतर्गत कलम१०३(१), २३८,३(५)नुसार गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील उगले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!