उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर :-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना येथे शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.भाजपाच ही निवडणूक पुर्ण ताकदीने स्वबळावर लढणार व मोठ्या मताधिक्याने जिंकणार असे आवाहन करण्यात आले.
प्रसंगी खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते, अरुण भाऊ मडावी माजी सरपंच,कवडु पा.जरीले तालुका अध्यक्ष,संजय भाऊ मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष,निलेश भाऊ ताजने माजी नगरसेवक, विजय रणदिवे माजी सरपंच,शशिकांत आडकीने उपसरपंच,अमोल आसेकर माझी नगरसेवक,संदीप शेरखी,ओम पवार उपसरपंच,वैशाली ताई मडावी सरपंच,प्रमोद कोडापे माझी सरपंच,मनोज तुमराम उपसरपंच,कार्तिक गोंडलावार,रामकिशन मडावी, ज्योती मंगाम आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.