- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली आज,रविवार १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे प्रित्यर्थ श्रद्धेय पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय जडवी तसेच युवकांचा स्पर्धा परीक्षेविषयी कल वाढून मोठ्या हुद्द्यावर उंच भरारी घेत गावाचे नाव पंचक्रोशीत गुंजावे,यासाठी आज बुद्धिमत्तेचे अथांग सागर असलेल्या स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधून श्रद्धेय पाणी वापर संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे.सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या डिजिटल अभ्यासासाठी विद्यार्थी तसेच युवकांकडून फार महत्व दिले जात आहे; मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा व जागा हे सर्वसामान्य मुलांना सहज परवडणारे नाही.यासाठी गावातील तरुणांना सदरची सुविधा मिळावी,या उद्देशाने स्वामी विवेकानंद सार्वजनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याने याचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावे; असे प्रतिपादन भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी आज अभ्यासिकेचे शुभारंभ प्रसंगी केले.
सुरू करण्यात आलेली अभ्यासिका ही शालेय विद्यार्थी तसेच युवकांसाठी असून २४ तास उपलब्ध असणार आहे.अभ्यासिकेच्या शुभारंभ पूर्वी बुद्धिमत्तेचे अथांग सागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस श्रद्धेय पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी तथा उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन, माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या जिवणपटलावर प्रकाश टाकून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.अभासिकेच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भाजप विस्तरक रोशन ठाकरे,श्रद्धेय पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आनंदराव बेदरे,सचिव ज्ञानेश्वर चौधरी,सदस्य नरेश ढोंगे,दिगांबर भजनकर,प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर चौधरी,पत्रकार नितेश पाटील,पदाधिकारी नंदकिशोर ढोरे,वासुदेव ठाकरे,आशिष दोनाडकर,नंदकिशोर बेहरे,मदन पचारे,ज्ञानेश्वर मेश्राम,सार्थक कसारे,योगेश गुरूनुले,आदित्य राऊत,मयंक शेंडे,मंथन ठाकरे,कुणाल रायशीडाम, मोहित दुपारे,भूषण बगमारे, कृष्णा कुमरे,सुमित तुपट,साहील बेदरे,ईशांत तुपट सह गावातील शालेय विद्यार्थी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -