- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना कायद्याची जाण असावी व नवीन कायद्यांची माहिती व्हावी तसेच विविध फसवणुकीपासून स्वतःला बचाव कसे करता येईल,या निमित्ताने आज,शनिवार ८ फेब्रुवारीला देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कायदे विषयक मार्गदर्शनाचे धडे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे यांनी दिले.
हल्ली ऑनलाइनचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागले आहेत.अशातच सायबर चोरटे विविध आमिष दाखवून जाळ्यात ओढवून घेतात.त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.कुठलीही लिंक वा अनोळखी इसमाने दाखविलेल्या आमिषाला बळी पडू नका.कायद्याने आपणांस अनेक संरक्षण दिले आहेत. पहिला भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) आता क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसीच्या जागी लागू करण्यात आला आहे.दुसरा भारतीय दंड संहिता (आयपीसी ) १८६० ची जागा भारतीय न्यायिक संहिता २०२३ ने घेतली आहे.तिसरा भारतीय पुरावा कायदा १८७२ ऐवजी भारतीय पुरावा कायदा २०२३ नुसार निर्णय घेतला जाईल.हे तीन फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू करण्यात आली आहेत.त्यामुळे एखादी घटना घडल्यास पुरावा म्हणून घटनेतील संपूर्ण चित्रीकरण तसेच इतर बाबींचा विचार केला जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
कोंढाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना नवीन कायद्याची ओळख करून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश्वर ढोरे यांच्या मार्गदर्शनात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कायदे विषयक मार्गदर्शन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी,सदस्य नितेश पाटील, पदवीधर शिक्षक संतोष टेंभुर्णे,शिक्षक सुरेश आदे,शिक्षक प्रवीण शेंडे,शिक्षिका ठवरे सह शाळेतील सर्व शिक्षकवृंद तथा शालेय विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका माधुरी रामगुंडे यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्यध्यापक योगेश्वर ढोरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार शिक्षक संतोष टेंभुर्णे यांनी यांनी मानले.
- Advertisement -