Saturday, September 12, 2026
Homeबीडकृषी महोत्सवाच्या नावाखालीअधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर घातला धिंगाणा..

कृषी महोत्सवाच्या नावाखालीअधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर घातला धिंगाणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बीड :- शासनातर्फे कृषी महोत्सवांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात येतात.कृषी महोत्सवांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा,कल्पना आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी यासाठी लाखो रुपये खर्च करून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.मात्र,शासनाच्याच अधिकाऱ्यांनी सर्व भान सोडून बेभान होऊन गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने,आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या,हिंदी गाण्यांवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.यादरम्यान “अभी जिंदा हु तो जी लेने दो”या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला.तर “चंद्रा” या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला.अधिकारी,कर्मचारी यांचा धिंगाणा पाहून, नेमके कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली मौज मजा करत धिंगाणा घालण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!