Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजकृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा - देसाईगंज तालुका काँग्रेस...

कृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा – देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना नियमित २४ तास विद्युत पुरवठा करण्याबाबत देसाईगंज तहसीलदार यांच्यामार्फतीन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.देसाईगंज तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून असून मागील वर्षाच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधा भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे.शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठ्याची अत्यंत गरज असतांना महावितरण कंपनीने ८ तास विद्युत पुरवठा केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातील कृषी पंपांना २४ तास नियमित वीज पुरवठा तात्काळ करण्यात यावा; असे निवेदन सादर करण्यात आले.  

निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष संजय करांकर,पोटगाव गावचे माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे,तालुका महासचिव मनोहर नीमजे,ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,तालुका युवक काँग्रेस कमिटी देसाईगंज अध्यक्ष पंकज चहांदे,जिल्ह्याचे ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे,देसाईगंज तालुका सचिव जगदीश शेंद्रे,तालुका सचिव महेंद्र खरकाटे,तालुका सहसचिव अतुल मेश्राम,सागर बनसोड,धनदेव सोनबावणे व तालुक्यातील मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!