Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकृषिमंत्री ऑनलाईन रम्मी खेळण्यात व्यस्त; विजय वडेट्टीवारांनी काढली खरडपट्टी..!

कृषिमंत्री ऑनलाईन रम्मी खेळण्यात व्यस्त; विजय वडेट्टीवारांनी काढली खरडपट्टी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असतांना मोबाईलवर ऑनलाईन रम्मी खेळतांनाचा एक्स अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) व्हिडिओ शेअर केला आहे.त्यानुसार विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे.अश्यातच विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देत खरडपट्टी काढली आहे.त्यांनी म्हटले की,शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय. सरकारमध्ये आनंदी आनंद आहे.जनतेच्या बोकांडी नतद्रष्ट सरकार बसले असून महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार पुन्हा होणार नाही.सरकारला कुणाचीच पर्वा नाही.दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत.कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे.पिकविम्याचे नियम बदलले असून आता पूर्णपणे पिकविम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत आहेत. मत घेण्यासाठी एक रुपयात विमा,आता मात्र तुमचं तुम्ही बघा,अशी भूमिका सरकार घेत आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.कोकाटे यांना भाजपवाल्यांनी केवळ नावालाच मंत्री केले आहे.त्यामुळे त्यांना कोणतेही काम उरलेले नाही,म्हणून ते रमी खेळत आहेत.कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी याआधीच्या विधानांचा दाखला देत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.राज्यात एकीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढताहेत, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामे नाही,पीक विम्याचा भार,कर्जमाफीचाही पत्ता नाही.त्यामुळे शेतकरी संकटात असतांना दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. खोटारड्या,धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे राहिले नाही.म्हणून यांना धडा शिकवा,असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
  •             व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!