उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- कुरखेडा तालुक्यातील पळसगाव-चांदागड परिसरात सध्या जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्ती तळ ठोकून आहेत.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागानेही गस्त वाढवली असून,गावकरीही सतर्क आहेत.जंगली हत्तींमुळे गावकऱ्यांचीच नव्हे, तर वनकर्मचाऱ्यांचीही झोप उडाली आहे.ओडिसा राज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी जिल्ह्यातील जंगलांचा ताबा घेतला आहे.त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून जंगली हत्ती जिल्ह्यात भ्रमंती करीत आहेत.रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्याला आपले अधिवास बनवले आहे.महिनाभरापूर्वी रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्हा मुख्यालयानजीक पोहोचला होता.येथे पंधरा दिवस भ्रमंती केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात परतला. सध्या तालुक्यातच जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.भ्रमंती करीत असताना हत्तींकडून वाटेत येणारी घरे आणि शेतपिकांचे नुकसान सुरुच आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कुरखेडा तालुक्यातील पळसगाव-चांदागड परिसरात सध्या जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.या परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्ती तळ ठोकून आहेत.गावकरी रात्र जागून काढत आहेत.त्याचबरोबर वनविभागाचे पथकही गस्त घालत आहे.हत्तींनी गावकऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांचीही झोप उडवली आहे.

