Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरकिती हे वाघाचे हल्ले म्हणावे; चेकपिपरी नंतर गणेशपिपरी गावातील महिला ठार..!

किती हे वाघाचे हल्ले म्हणावे; चेकपिपरी नंतर गणेशपिपरी गावातील महिला ठार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात मानवी जीव जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नुकतेच शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास नागभीड तालुक्यातील आकापूर गाव परिसरातील शेतशिवारात वाघाने एका शेतकऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.यात नागभीड तालुक्याच्या आकापूर गावातील वासुदेव लक्ष्मण वेटे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.सदरची घटना ताजी असतांनाच लागोपाठ शनिवार नंतर रविवार २६ ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात शेतात जनावरांसाठी चारा कापायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील भाऊजी पाल या शेतकऱ्याचा वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.चेकपिपरी पासून गणेशपिपरी गाव हे अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असून दोन्ही घटना एका आठवड्याच्या अंतरावर घडल्याचे दिसून येत आहे.
अल्का पांडुरंग पेंदोर वय ४३ वर्षे,रा.गणेशपिपरी, ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर यांचा वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना काल रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.अल्का या काल रविवारी घरच्या जनावरांसाठी चारा कापण्यासाठी स्वतःच्याच शेतावर एकट्याच गेल्या होत्या.दुपार होऊनही पत्नी घरी परतली नसल्याने त्यांचे पती पांडुरंग पेंदोर दुपारच्या सुमारास शेतात गेले असता पत्नी शेतावर आढळून आली नाही.आवाज देऊनही पत्नीने प्रतिसाद दिलेला नसल्याने घाबरलेल्या पांडुरंग यांनी गावात परतून गावकऱ्यांना माहिती देत गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून शोधमोहीम राबवली असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अल्का पेंदोर यांचा मृतदेह शेतशिवारात आढळून आला.घटनेने गावकरी आक्रमक होऊन वाघाचा बंदोबस्त करणार नाही; तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही,अशी भूमिका  गावकऱ्यांनी घेतली होती.त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
कित्तेक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले व्यक्ती कुणाचे पती,तर कुणाचे वडील होते.त्यातच कुणाच्या तरी आई होत्या.कुणावर संपूर्ण कुटुंब निर्भर होते.त्यांच्या अशा अवेळी जाण्याने कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली आहे,ती पोकळी केवळ आर्थिक मदतीने भरून निघणार नाही; तर शासनाने यावर ठोस उपाययोजना करून घटनांवर आळा घालणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!