Thursday, September 3, 2026
Homeनागपूरदिवाळीत लागलेल्या आगीची तक्रार; तब्बल १८ जणांवर गुन्हे दाखल..! - तब्बल चार...

दिवाळीत लागलेल्या आगीची तक्रार; तब्बल १८ जणांवर गुन्हे दाखल..! – तब्बल चार वर्षे फायर ऑडिटच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या.विविध भागात ६ हून अधिक भागांत आगीचा भडका उडाला.फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले होते.अश्यातच नागपूर शहरातील लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला २२ ऑक्टोंबरच्या रात्री ९ वाजता आग लागून आगीत अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन,इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य असे एकूण जवळपास ५० लाखांचे नुकसान झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच नागपूर महानगर पालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी लागली असल्याने वाढत गेली.रात्रभर ६ अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.यासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे नागपूर शहराच्या विविध भागात आगीच्या तब्बल सहा घटना घडल्या होत्या.फटाक्यांच्या ठिणग्या कचरा व वाहनावर उडाल्याने अनेक ठिकाणची वाहने जळून खाक झाली होती.अश्यातच आता नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील रिलायन्स मॉलच्या ९ मजली इमारतीला आग लागल्याप्रकरणी इमारतीतील रहिवासी अनिल द्वारकादास गांधी वय ६८ वर्षे यांनी तक्रार दाखल केल्याने बजाजनगर पोलिसांनी रिलायन्स मॉलचे अधिकारी,जमीन लीजवर देणारे १२ व्यक्ती आणि महाचायचे अधिकारी अशा १८ जणांविरुद्ध कलम १२५,१२६(१),२८७,३२९(१), ३२४(१),३२६(एफ), ३२६ (जी),३(५)नुसार गुन्हा दाखल केला आहे.रिलायन्स मॉलच्या इमारतीत निवासी आणि व्यावसायिक गाळे आहेत.रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर मॉलने २०२१ नंतर कुठलेही फायर ऑडिट केले नव्हते.अनिल गांधी यांनी वारंवार रिलायन्स स्मार्टचे अधिकारी व जागेच्या मालकांना सूचना दिली होती.परंतु,त्याबाबत काहीच उपाययोजना न केल्यामुळे ही भीषण आग लागली आणि अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंग,वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक साहित्य,एसी व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले,त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर अशी घटना घडली नसती.प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!