Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरन्यायाधीश बीआर गवई नंतर ५३ व्या सरन्यायाधीशांची शिफारस..!

सरन्यायाधीश बीआर गवई नंतर ५३ व्या सरन्यायाधीशांची शिफारस..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष असून सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तींनी सदरचा नियम लागू आहे.नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याआधी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका नावाची शिफारस करतात.सदरची शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवायची असते. यानंतर सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.अश्याच प्रकारे आज,सोमवार २७ ऑक्टोंबरला भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई(बीआर गवई)यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे.सरन्यायाधीश बीआर गवई हे येत्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.याआधीच नियम आणि परंपरेला अनुसरुन सरन्यायाधीश बीआर गवई यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका वरिष्ठ न्यायमूर्तीच्या नावाची शिफारस केली आहे.ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवली आहे.आता देशाच्या ५३ व्या सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.याआधी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बीआर गवई यांनी सूत्रे हाती घेतली होती.गवई यांनी १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती.ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.त्यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचणारे हरियाणातील पहिले व्यक्ती असतील.त्यांच्या नावाची शिफारस करतांना, सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले की,न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आणि सक्षम आहेत.त्यामुळेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!