नागपूर :- “पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की,लावणीच्या कार्यक्रमांसाठी?”असे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूरच्या गणेशपेठ येथील कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमातील लावणी सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नव्या वादाची ठिणगी पेटू लागली आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुरातील मुख्य कार्यालय गणेशपेठ परिसरात असून काल,रविवार २६ ऑक्टोंबरला कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला.प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी “मला जाऊ द्या घरी घरी आता वाजले की बारा..” या गाण्यावर नृत्य सादर केले. लागलीच पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारे लावणीचे सादरीकरण झाल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटून सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन टीकेची तोफ डागली जात आहे.एकीकडे शेतकऱ्यांची प्रश्र्ने,महागाई,बेरोजगारी व इतर समस्यांनी ग्रासले असतांना अश्या प्रकारचे कृत्य अशोभनीय असून विरोधी पक्षांकडून टीकास्त्र डागले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे,पक्षाचे कार्यालय जनतेची कामे करण्यासाठी असतात.
- व्हायरल व्हिडिओ👇

