- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच(डिबीए)महाराष्ट्र रत्नागिरी,या साहित्यिक संस्थेच्या वतीने व यवतमाळ जिल्हा कमिटीच्या वतीने डिबीएचा पाचवा वर्धापन दिन तसेच काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ आणि राज्यस्तरीय कवी संमेलन यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे डिबीएचे संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच २५ ऑक्टोंबर रोजी पार पडला. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे(छायासूत)हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या विचारमय लेखणीतून “चला मानसांनो… माणुसकी समजून घेऊ” अशी मानव जातीला प्रकाशमय करणारी,समाजाला प्रेरणादायी कविता सादर करत उपस्थित सर्व मान्यवर,साहित्यिक,रसिकांची मने जिंकली.त्यांचे कवितांच्या माध्यमातून सामाजिक योगदान तसेच साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल आयोजक,प्रायोजकांनी घेऊन दुर्गे यांचा
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुस्तक व मानाचा पट्टा देऊन डिबीएचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक मनोज जाधव, डिबीएच्या आधारस्तंभ/संपादिका भावना खोब्रागडे, कवी संमेलनाध्यक्षा प्रतिभा गेडाम,यवतमाळ जिल्हाध्यक्षा संध्या खरतडे,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षा कुसुमताई मनवर,यवतमाळ जिल्हा सचिव संगीता कानिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या सत्काराबद्दल साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार,गाववासीय,आप्तजन या सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
- Advertisement -

