Thursday, September 3, 2026
Homeनागपूरशेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा 'महाएल्गार' मोर्चा.. - राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी...

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा ‘महाएल्गार’ मोर्चा.. – राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी,दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून १४ जून २०२५ पर्यंत अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू  कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने तब्बल सातव्या दिवशी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आला होता.शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार योग्य वेळी निर्णय घेईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.मात्र,अजूनपावेतो शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नसल्याने आता शेतकरी कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करू,या उद्देशातून शेतकरी,दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे येत्या,मंगळवार २८ ऑक्टोंबरला ‘महाएल्गार’ मोर्चाचे आयोजन केले आहे. बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरातील परसोडी वर्धा रोड,जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.शेतकऱ्यांच्या शेतमामालाला योग्य हमीभाव मिळत नाही.त्यामुळे शेतमाल कमी किंमतीत विकावा लागतो आहे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकरी आता अधिक कर्जबाजारी होत आहे.तरीही शेतकरी कर्जमाफी केली जात नाही आणि त्याची योग्य वेळ येत नाही; हे दुर्दैव असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुळापासून धोरणे बदलली पाहिजेत,असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.मंगळवारी होणाऱ्या महाएल्गार आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी,स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती,राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर,अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ.अजित नवले,स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप,शेतकरी नेते प्रकाश पोहरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आदी सहभागी होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!