- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यानुसार,देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच त्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार आटोकाने प्रयत्न करीत असून सुरक्षा दल त्या दिशेने पाऊले उचलीत आहे. अश्यातच आज,रविवार २६ ऑक्टोंबर रोजी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात तब्बल २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यात १३ महिला तर ८ पुरुष सदस्यांचा समावेश समावेश आहे. त्याचबरोबर,१८ शस्त्रेही अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यात ३ एके ४७ रायफल्स,४ एसएलआर रायफल्स,२ आयएनएएसएएस रायफल्स,सहा ३०३ रायफल्स,२ सिंगल शॉट रायफल्स आणि १ बीजीएल शस्त्र सुपूर्द केले.बस्तर रेंज पोलिसांनी सुरू केलेल्या ‘पूना मार्गेमः पुनर्वसनाद्वारे पुनर्मिलन’ या उपक्रमांतर्गत नक्षल वाद्यांनी शस्त्रे टाकली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आत्मसमर्पण करणाऱ्या २१ नक्षलवाद्यांमध्ये ४ डीवीसीएम,९ एसीएम आणि ८ पक्ष सदस्यांचा समावेश आहे.संपूर्ण नक्षलवादी हे केशकाल विभागाच्या कुएमारी/किस्कोडो क्षेत्र समितीचे भाग होते.यामध्ये समितीचा सचिव मुकेशचाही समावेश आहे.
- Advertisement -

