- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ तसेच बोगस मतदान करून मतदानात कशी वाढ करण्यात आली; याचा भांडाफोड केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.या प्रकाराने विविध स्तरातून आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर येत आता मतदार याद्यांची पडताळणी करणार आहे.
निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR)सुरू करणार आहे.सुरुवातीला १० ते १५ राज्यांमध्ये सुरू होईल.पुढील वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण प्रथम आयोजित केला जाईल.आसाम,तामिळनाडू,पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.महत्वाचे म्हणजे,ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत; अश्या भागात सध्या विशेष सघन पुनरीक्षण(SIR)आयोजित केले जाणार नाही.कारण खालच्या स्तरावरील कर्मचारी त्या-त्या भागातील निवडणुकांमध्ये व्यस्त राहणार आल्याने विशेष सघन पुनरीक्षणसाठी वेळ काढू शकणार नाहीत.नंतरच्या कालावधीत म्हणजेच निवडणुका संपल्यानंतर उर्वरित राज्यांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण आयोजित केले जाणार आहे.
- Advertisement -

