- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या सावंगी हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग येळाकेळी परिसरात घडली. मुरली कृष्णा सुरेंद्र बाबू जोनाला वय ५५ वर्षे,रा.रामदेव पार्क शिवार गार्डन जवळ मिरा रोड(पूर्व),भाईंदर,ठाणे असे मृत कार चालकाचे नाव असून अपघात इतका भीषण होता की कार क्रेनच्या मदतीने रस्त्याकडेला करून गाडीत फसलेला मृतदेह क्रेनच्या साह्याने कारच्या समोरील कॅबिन ओढून बाहेर काढण्यात आला.दरम्यान, अपघात घडताच अज्ञात वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला.
मुरली जोनला हे मुंबईकडून नागपूरच्या दिशेने एमएच ०२ सीझेड ५५२७ क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावरून जात होते.दरम्यान,त्यांचे कारच्या स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले आणि कार थेट तिसऱ्या लेनमधून जात असलेल्या अज्ञात वाहनाला मागून धडकली.यात कार चालक मुरलीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले व मृतदेह गाडी बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या साहाय्याने
पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवला.घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
- Advertisement -

