Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरकलाकारी..! खरेदीच्या बहाण्याने नोटरीद्वारे दोन टीप्पर घेतले ताब्यात अन् रक्कम न देताच...

कलाकारी..! खरेदीच्या बहाण्याने नोटरीद्वारे दोन टीप्पर घेतले ताब्यात अन् रक्कम न देताच केले लंपास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मार्ग कोणताही असो,बस्स पैसा मिळाला पाहिजे; अशी अनेकांची मनधारणा झालेली आहे.पण, एखाद्या वाम मार्गाला जाऊन निवडलेला मार्ग चिरकाल टिकणारा नसतो.चोर कितीही चोऱ्या करीत असला तरीही एक ना एक दिवस जाळ्यात अडकत असतोच आणि असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,आरोपीने खरेदीच्या बहाण्याने वकीलाकडे नोटरी करून दोन टीप्पर ताब्यात घेतले.टीप्पर ताब्यात तर घेतले खरी,पण मालकास पैसे न देताच दोन्ही टीप्पर लंपास करून गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे केले.प्रकरणी भद्रावती येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या घुग्घुस पोलिसांनी मुसक्या आवळून आरोपीकडून चेसिसचे तुकडे,टायर, ऑईल टाकी,फायबर बोनेट व इतर साहित्य जप्त केले आहे.प्रकरणात नागपूर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.तर यातील मुख्य आरोपी सध्या छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथील व्यवसायिक गोविंद अतुल कुंडू यांनी एमएच २९ बीई १६५६ व एमएच २९ बीई १६५७ क्रमांकाचे टाटा डंपर घुग्घुस येथील साबीर अली सिराजउद्दीन सय्यद यांना नोटरी करून विक्री केले. मात्र,साबीर सय्यदने ठरलेली रक्कम न देता फसवणूक करून दोन्ही ट्रक लंपास केले.या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता एपीआय योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला.तपासादरम्यान आरोपीने ट्रक नागपूर येथील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी याच्या ताब्यात दिल्याचे समोर आले.घुग्घुस पोलिसांनी नागपूर येथे धाड टाकून जिया अन्सारी याला ताब्यात घेत चौकशी केली असता साबीर अलीच्या सांगण्यावरून दोन्ही ट्रक गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे करण्यात आल्याची कबुली दिली.त्यानुसार,त्याच्याकडून चेसिसचे तुकडे,टायर,ऑईल टाकी,फायबर बोनेट व इतर साहित्य जप्त केले आहे.दरम्यान,मुख्य आरोपी साबीर अली सय्यद याच्यावर छत्तीसगडमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सध्या तेथील पोलिसांच्या ताब्यात आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात एपीआय योगेश पाटील,सचिन तायवडे,पोलीस शिपाई परमेश्वर डोईफोडे यांचेसह पथकाने पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!