उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष कोरपनाचे नारायण हिवरकर तथा शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष कन्हाळगावचे प्रमुख पावणे स्वतंत्रकुमार शुक्ला,जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेचे मुख्याध्यापक जिवणे,जुनघरी व भगत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु वैष्णवी दोरखंडे,द्वितीय क्रमांक गणेश मरापे व तृतीय क्रमांक कु.पवित्रा देवतळे या तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुछ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पहिला क्रमांक कसा मिळवता येईल; याची जिद्द ठेवावी व पुढील शिक्षण चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून पदवीधर व्हावे; असे मोलाचे मार्गदर्शन केले.