उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक्ता विभाग,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य औधोगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंच्या राष्ट्रीय सेवा योजना मार्फत कोंढाळा निवासी ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर विशेष शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्म समभाव,सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा; यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
“मी नाही पण तू ” या बोधवाक्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय नागरिक,जबाबदारी , टीमवर्क आणि संविधानिक,लोकशाही दृष्टीकोण निर्माण व्हावा असे विविध गुण विकसित करण्याची जबाबदारी या निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिरा दरम्यान केली जाते.
शिबिराचे कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी रोशनीताई पारधी माजी सभापती महिला व बालकल्याण विभाग जिल्हापरिषद गडचिरोली,गजानन सेलोटे उपसरपंच, किरणताई कुंभलवार पोलीस पाटील कोंढाळा,प्रदीप तुपट ग्रामवासी,नितेश पाटील लोकमत पत्रकार,संदीप साबळे,प्राचार्य सुरेश एस.चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, अनिल मुलकलवार मुख्याध्यापक, टी.आर खोब्रागडे गटनिर्देशक,आर.एम.गोतमारे गटनिर्देशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज , सी.एम.गरमळे रासेयो मुख्य समन्वयक,व्ही.वाय. नागमोती रासेयो सह समन्वयक,ए.व्ही.भोले,आर बी.भोयर,आर.के.लोही,सी. डी.समर्थ, एम.एस.कापगते, शोभा एस.प्रधान,एल एच.लाडे,एच. के मरसकोल्हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी वृंद,ग्रामपंचायत सदस्य वकर्मचारी यांचे सहकार्य लाभले असून सदर उद्घाटन शिबिरप्रसंगी गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
प्रास्ताविक सी.एम.गरळमळे रासेयोसमन्वयक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मेश्राम व आभार प्रदर्शन विष्णू नागमोती यांनी केले.