Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीमार्कंडादेव यात्रेत अवैध तंबाखू व दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा...- अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी...

मार्कंडादेव यात्रेत अवैध तंबाखू व दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा…- अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या सूचना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- अवैधदारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकमांतर्गत जिल्हा समन्वय जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारला बैठक पार पडली.बैठकीत दारू व तंबाखूमुक्त मार्कंडा यात्रेच्या मुक्तिपथने मांडलेला प्रस्तावास मान्यता देण्यात आली.मार्कंडा यात्रा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दारू व तंबाखूमुक्त साजरी होण्यावर भर देण्यात यावा.मुक्तिपथ अभियान,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण चमू,अन्न औषध विभाग,पोलिस विभाग यांचे पथक निर्माण करून अवैध तंबाखू व दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी.विभागाने शाळेच्या आजूबाजूला १०० मीटर अंतर्गत असलेले पानठेले हटवून शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यावर भर द्यावा व पुढील बैठकीत आकडेवारी सादर करावी.अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केल्या आहेत.चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेत अवैधरित्या तंबाखू,दारूविक्री केल्यास कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिले असून सदर बैठकीदरम्यान बोलत होते. 

बैठकीत संतोष सावळकर यांनी मागील २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृतांत व अनुपालन अहवाल याचे वाचन केले.बैठकीला मुक्तिपथचे संचालक तपोजेय मुखर्जी,उपसंचालक संतोष सावळकर,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षका स्वाती काकडे,तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक स्वाती साठे,एलसीबी पथकाचे उल्हास भुसारी,अन्न औषध विभागाचे सुरेश तोरेम,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जठार, शिक्षणाधिकारी निकम,प्रतिनिधी गेडाम,राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे मीना दिवटे,राहुल कंकनालवार, दिनेश खोरगडे,राहुल चावरे,डॉ. मृणाली रामटेके, स्थानिक गुन्हे शाखेचे मंगेश राऊत,बीटपल्लीवार, पोलिस विभाग,आरोग्य,शिक्षण,जिल्हा माहिती अधिकारी आदी विविध विभागाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!