- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजचे जीवन हे दगदगीचे झाले आहे.सकाळ झाली की,कामावर जाणे आणि सायंकाळ झाली की परत येणे.दिवस उजाळला की, पुन्हा तीच दिनचर्या सुरू.त्यामुळे कुणाकडे वेळच उरलेला नाही.त्यामुळेच हल्ली मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी-विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.त्यातही कुठे न जाता घर बसल्या, घरपोच सेवा मिळू लागल्याने ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.मात्र,आपण जी वस्तू किंवा इतर सामान खरेदी करतो; खरोखरच तीच वस्तू वा साहित्य आहे काय? नसल्यास काय करावे?
सणासुदीत नागरिक जोरदार ऑनलाइन खरेदी करतात.निरनिराळ्या प्रकारचे फॅशनवेअर,ब्युटी प्रोडक्ट्स,स्मार्ट गॅझेट,इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी खरेदीवर लोकांचा भर असतो.कंपन्यांकडून जोरदार जाहिरात केली जाते.परंतु,अनेकदा घरी डिलिव्हर करण्यात आलेले उत्पादन जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे नसते किंवा भलत्याच ब्रँडची वस्तू गळ्यात मारली जात असते.याविरोधात तक्रार करण्यासाठी सरकारने नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनचा व्हॉट्सॲप ८८००००१९१५ (8800001915)नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच १८००११४००० आणि १९१५ या क्रमांकावरही तक्रार करता येते.
- Advertisement -

