Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीजनतेनेच निवडणूक हाती घेतली तर काय चमत्कार होऊ शकतो...! -विकासाची कास धरणारे...

जनतेनेच निवडणूक हाती घेतली तर काय चमत्कार होऊ शकतो…! -विकासाची कास धरणारे खासदार डॉ.नामदेव किरसान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए…’ या ओळींना साजेशी वाटचाल करुन डॉ.नामदेव किरसान यांनी नेतृत्व व कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागात उपायुक्त ते गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे खासदार हा त्यांचा प्रवास सर्वांना अचंबित करणारा आहे.
जनतेनेच निवडणूक हाती घेतली तर काय चमत्कार होऊ शकतो,याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला.अनेक संकटे आली,कठीण प्रसंग आले,पण अढळ निष्ठा,सचोटीच्या जोरावर सामान्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई त्यांनी सोडली नाही. उच्चशिक्षित असलेले खासदार डॉ.नामदेव किरसान यांना नुकताच ‘लोकमत’च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेच्या ‘लोकमत लोकनायक’ सन्मान प्रदान करण्यात आला. गोविंदपूर,जि.गोंदिया येथे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले नामदेव किरसान हे शिक्षणाची कास धरून राज्यसेवा परीक्षेचा गड सर करत राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग १ च्या हुद्द्यापर्यंत पोहोचले.१८ वर्षे नोकरी केल्यावर उपायुक्त पदावर असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते सक्रिय राजकारणात आले.काँग्रेसचे विचार घराघरात व मनामनात पोहोचण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. डॉ.किरसान यांनी पक्षबांधणी करतानाच भाजप सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केली.सोनिया गांधी,राहुल गांधी तसेच काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.पक्ष संघटनेत विविध पदे भूषविली. आदिवासी सेवक या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. २०२४ मध्ये काँग्रेसने त्यांना संधी दिली.दहा वर्षे सत्तारुढ असलेल्या भाजपला आस्मान दाखवत त्यांनी विजयी मुसंडी मारली.गडचिरोली- चिमूरच्या सर्वांगीण विकासाचा त्यांचा संकल्प आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!