उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शिमग्याच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.चैतन्य राजेश मुटकुरे असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे लाखनी तालुक्यातील लाखोरी गावावर शोककळा पसरली आहे.चैतन्य मुटकुरे हा उज्वल विद्यालयात १० वी वर्गात शिक्षण घेत होता.रंग उधळणी खेळून झाल्यानतंर गावातील चार ते पाच मित्रांसोबत तो गावाजवळ असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेला होता.चैतन्य हा त्याचा मित्र नमन सुधीर चेटूले आणि इतर चार मित्रांसह पाण्यात उतरला.परंतु चैतन्यला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला.पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला.यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही.घटनेची माहिती गावात कळताच लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली.गावकऱ्यांनी चैतन्यचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृतहाचा शोध सुरू केला.यानंतर काही तासाच चैतन्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.