Wednesday, August 12, 2026
Homeचंद्रपूरउपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी रेती तस्करांवर केली मोठी कारवाई- ३...

उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी रेती तस्करांवर केली मोठी कारवाई- ३ लाख २५ हजारांचा दंड केला वसूल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- मूल तहसील ते हायवापर्यंत रेती वाहतुकीस बंदी घालण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. या आदेशाकडे दुर्लक्ष करून मूल तहसीलच्या उमा नदीपात्रातून पोकलेनच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी नदीतील वाळू उपसा करण्याचे काम सुरू होते.रात्री अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी पकडला.

सदर परिसरातून नियमित रेती तस्करी होत असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रेती भरलेला हायवा ट्रक जप्त केला व वाहतूक करणाऱ्या मालकाकडून तत्काळ ३ लाख २५ हजारांचा दंड वसूल केला.रेतीचे एमएच ३३_४४८५ क्रमांकाचे वाहन मूल प्रशासकीय इमारतीसमोर जमा करण्यात आले आहे. यावेळी पथकातील नायब तहसीलदार राम नैताम, तुंकलवार,विशाल जिदगीलवार,महसूल विभागाचे प्रवीण गेडाम उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!