Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजउद्याला प्रलंबित कृषी पंपांची वीज जोडणीधारक पिडीत शेतकऱ्यांची बैठक..-देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची,धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित...

उद्याला प्रलंबित कृषी पंपांची वीज जोडणीधारक पिडीत शेतकऱ्यांची बैठक..-देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची,धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या कृषी पंपांच्या नवीन वीज जोडणीसाठी पाच वर्षांपूर्वी त्या-त्या तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज सादर केली.त्यानुसार वितरण कंपनीला मागणी देयकही भरले.मात्र,अजून पर्यंत वीज वितरण कंपनीने कृषी पंपांची जोडणी करून दिलेली नाही.अश्यातच आता कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी पाच वर्षांपूर्वी मागणी देयक भरलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्यावे,अश्या सूचना विद्युत वितरण कंपनी करीत असल्याने अगोदरच विहिरीतील तसेच इतर ठिकाणातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकऱ्यांसाठी सोलर पंप उपयोगी पडणार नाही; त्यामुळे उद्या,सोमवार १ जून रोजी शेतकऱ्यांसोबत चर्चा विनिमय करण्याकरीता दुपारी १२ वाजेच्या सुमारास देसाईगंज शहराच्या हुतात्मा स्मारक जवळील सिंधी भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.सदर बैठकीस देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची सह धानोरा तालुक्यातील पिडीत शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!