Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्यापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा..

उद्यापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला उद्या,मंगळवार १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मंडळाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.विद्यार्थ्यांचा तणाव कमी करणे आणि मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शी करणे हा यामागील उद्देश आहे.परीक्षा सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात हजर होणे अनिवार्य असून, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.विद्यार्थ्यांनी ही बाब विचारात घेत घरातून निघण्याचा सूचना मंडळाने केली आहे.यावर्षी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनस्क्रीन केले जाईल,उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल सर्व्हरवर अपलोड केल्या जातील आणि परीक्षक संगणकाच्या माध्यमातून त्यांची तपासणी करतील.त्यामुळे त्रुटी कमी होऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जलद होईल.इयत्ता दहावीच्या उत्तरपत्रिका पारंपरिक पद्धतीनेच तपासल्या जातील. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही बदल केला गेला आहे.सुमारे ५० टक्के प्रश्न केस स्टडी आणि वास्तविक जीवनावर आधारित असतील तर,२० टक्के बहुविकल्पीय आणि ३० टक्के वर्णनात्मक प्रश्न राहतील.पाठांतराऐवजी विश्लेषणात्मक आणि संकल्पनात्मक समज वाढविण्यावर विशेष भर राहणार आहे.उत्तरपत्रिका लेखनासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.विज्ञान आणि सामाजिक विज्ञान विषयांमध्ये विभागनिहाय उत्तर लिहिणे अनिवार्य असेल.चुकीच्या विभागात दिलेले उत्तर मूल्यांकनात समाविष्ट केले जाणार नाही.तसेच,परीक्षा केंद्रावर कॅलक्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास पूर्णतः बंदी आहे.विशेषतः यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळेल.फेब्रुवारी-मार्चमध्ये मुख्य परीक्षा होईल,तर मे महिन्यात सुधार परीक्षा देता येईल. दोन्हीपैकी ज्या सत्रात जास्त गुण मिळतील,तेच गुण अंतिम निकालात ग्राह्य धरले जातील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!