Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीअभियांत्रिकी शिक्षणाचा गैरवापर; नकली पोलीस बनून करायचा ब्लॅकमेल.. - असली पोलिसांनी आवळल्या...

अभियांत्रिकी शिक्षणाचा गैरवापर; नकली पोलीस बनून करायचा ब्लॅकमेल.. – असली पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आजची तरुणाई झटपट पैसा आणि हिरोपंतीच्या नादात वाममार्गाला जाऊ लागली आहे.यात सर्वच तरुणांना दोष देता येणार नाही.तर काही तरुण याला अपवादही आहेत.अनेक तरुण परिस्थितीशी सामना करून येणाऱ्या संकटांना सामोरे ढकलून आयुष्य घडविण्याचे कार्य करतांना दिसून येतात.अश्यातच बीई(बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग)म्हणजेच अभियांत्रिकीची पदवी प्राप्त ३० वर्षीय तरुण आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करायचा व नकली पोलीस बनून नागरिकांकडून खंडणीची मागणी करायचा.तो एवढ्यावरच न थांबता इंटरनेटद्वारे विविध हॉटेल चालक, लॉज मालक आणि व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांना लक्ष्य करत होता.मात्र,चोर कितीही शातिर दिमाख वापरत असला तरीही खाकीच्या पॉवरातून सुटूच शकत नाही आणि तसेच झाले.नकली पोलीस बनून नागरिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी तरुणाच्या असली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चंदन दिगूराम सांगळे वय ३० वर्षे,रा.आष्टी ता.चामोर्शी, जि.गडचिरोली असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयात हजर केले असता,त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी चंदन हा तांत्रिक माहितीच्या आधारे इंटरनेटद्वारे संपर्क क्रमांक मिळवून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी करायचा.अश्याच प्रकारे त्याने अहिल्यानगर येथील एका व्यक्तीला फोन करून ‘मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल पाटील बोलत आहे’ तुमच्या विरोधात गंभीर तक्रार असल्याने यातूनतुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल तर ५ लाख रुपये द्यावे लागेल,अशी फोनवरून धमकी दिली. लागलीच याबाबत अहिल्यानगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात  सायबर पथकाने कॉल डिटेल्स,आयपी लॉग्स व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता
आरोपीचे लोकेशन गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात दिसून आले.लोकेशनची माहिती कळताच अहिल्यानगरचे पोलीस पथक गडचिरोलीत दाखल झाले.तेथून अहिल्यानगरचे पोलिस पथक आष्टी परिसरात येत असल्याची भनक
आरोपीला लागताच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता अहिल्यानगर पोलिसांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.पोलीस तपासात त्याच्याविरुद्ध रत्नागिरी आणि गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!