Monday, March 17, 2025
Homeआरमोरीआरमोरी शहर बनला अवैध धंद्यांचा 'गडकिल्ला'.....!
spot_img

आरमोरी शहर बनला अवैध धंद्यांचा ‘गडकिल्ला’…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आरमोरी :- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असून शहराच्या विविध ठिकाणी दारूचा महापुर,अवैधरित्या सट्टा-पट्टी व इतर धंदे उदयास आले असल्याने एकप्रकारे आरमोरी शहर अवैध धंद्यांचा ‘गडकिल्ला’ तर बनला नसावा ना? अशी शक्यता जनमानसात वर्तविण्यात येत आहे.याच बरोबर संबंधित विभाग निद्रावस्थेत गेले की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात १ एप्रिल १९९३ पासून दारू बंदी करण्यात आली.मात्र या निमित्ताने अवैध धंदे करणारे उदयास आले.संपूर्ण जिह्यात दारू बंदी ही नावापुतीच झाली असल्याचे वास्तव हल्ली दिसून येत आहे.अशातच आरमोरी शहर अवैध धंद्याचे माहेरघर झाले असल्याचे वाटत आहे.आरमोरी शहरातील टिळक चौक, बाजारपेठ(बाजारटोली),टेलिफोन टॉवर,टोली बर्डी, ठवरी मोहल्ला,गायकवाड चौक व काळागोटा या ठिकाणी अवैधरित्या देशी, विदेशी,गावठी मोहफुलाची दारू व त्यातच ग्राहकांच्या मागणी नुसार थंडीगार बिअर मिळण्याची एकमेव स्थाने असल्याची वार्ता जनमानसात आहे.यातील टेलिफोन टॉवर व टोली(बर्डी) येथील दारूचा मुख्यसूत्रधार असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.सदर वार्डात गेले असता दारूची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली दिसून येते.अवैधरित्या दारू विक्रेत्यांमध्ये महिला राज असल्याने तळीरामांचा पिण्याचा आणखी जास्तीत जास्त कल वाढलेला दिसून येतो.दिवसागणिक रोजी-रोटी कमावणारे नशेच्या आहारी गेल्याने व संबंधित विभागाच्या सहकार्याने दारू विक्रेते मालामाल तर पिणारे कंगाल असे दिसून येत आहेत.

अवैधरित्या चालणारे सट्टा-पट्टीचे व्यवसाय शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात जोमात सुरू आहे. सट्टा-पट्टी चालक एकच असल्याने सर्वत्र बोलबाला करून व सर्वांची तोंडे बंद करून खुलेआम, राजरोसपणे सट्टा-पट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे.शहरात अनेक अवैधरित्या धंद्याचे सुर प्रशासकीय यंत्रणेतून चुप्पी साधून आमच्या कार्यक्षेत्रात राम राज्य सुरू असल्याचे भासवंतांना दिसून येत असल्याने जनमानसात नवल वाटत आहे.अशातच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांमुळे आरमोरी शहराची प्रतिमा मलिन होत आहे.जोपर्यंत अवैधरित्या धंदे करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवली जाणार नाही.तोपर्यंत शहराची प्रतिमा मलिन होतच राहणार.यासाठी अवैधरित्या धंदे करणाऱ्यांचे मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून सूर निघू लागले आहेत.संपुर्ण आरमोरी शहराची जाणीवपूर्वक माहिती घेऊन अवैध व्यावसायिक व त्यांना मदत करणारे अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची जन मानसातील मागणी आता जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

आजपासून ते २२ मार्च पर्यंत जलजागृती सप्ताह..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी,...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!