Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजआरमोरी विधानसभा जिंकण्यासाठी लढणार…-वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

आरमोरी विधानसभा जिंकण्यासाठी लढणार…-वंचित बहुजन आघाडीचे राजरतन मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आरमोरी विधानसभा जिंकण्याच्या उद्धेशाने लढणार असल्याची माहिती जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी दिली.      संपुर्ण महाराष्ट्रात ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात आरक्षण बचाव ही मोहिम सुरु असुन बहुजन समाजातील अनेक जातींचा या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे.लोकसभा निवडनुकीत संविधान बचाव हा मुख्य मुद्दा असल्याने आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तानाशाही संपुष्टात आणन्याच्या उद्देशाने आंबेडकरी समाजाने भरभरुन कॉंग्रेस पक्षाला मतदान केले.मात्र,कॉंग्रेस पक्षाने दिशाभुल केली.महाविकास आघाडी सोबत युती नसतांनाही ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुर,सोलापुर,सातारा,बारामतीसह ७ जागांवर आपले उमेदवार उभे केले नाही.मात्र,अकोला मतदार संघात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून कॉंग्रेसने बाळासाहेबांना निवडुन येण्यासाठी उमेदवार उभे करायला नको होते.मात्र कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्या नंतरही प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पराभुत उमेदवाराची सांत्वन सभा घेतली म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पोहचु द्यायचे नाही; ही मानसिकता नाना पटोले यांनी प्रदर्शीत केली.हीच मानसिकता कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांविषयी बाळगली होती.आंबेडकरी समाज कॉंग्रेस पक्षाचा गुलाम नाही.या समाजाचे आरमोरी विधानसभेत मोठे अस्तित्व आहे.अनुसुचित जमातिसाठी ही जागा आरक्षित असल्याने या समाजाचे किमाण २० हजार मते घेणारा उमेदवार मिळावा; याची चाचपणी सुरु असुन समाज बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असुन भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा रंगतदार सामना आरमोरी विधानसभा क्षेत्रात पहावयास मिळेल; अशी माहीती वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!