Wednesday, September 23, 2026
Homeकुरखेडाआमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नाने बांधकाम लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित.. - बांधकाम लाभार्थ्यांना...

आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नाने बांधकाम लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित.. – बांधकाम लाभार्थ्यांना वितरण होई पर्यंत मिळणार वाळू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गेली तीन ते चार वर्षांपासून रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने सगळीकडेच मोठ्या अवैध वाळू उपसा केला जातो आहे.अशातच घरकुल बांधकाम लाभार्थी तसेच इतर बांधकामे करण्यासाठी वाळूची नितांत गरज असतांना शासनाच्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पाच ब्रास मोफत वाळूसाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.त्यातच आता गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा,देसाईगंज,कोरची,आरमोरी सह इतरही तालुक्यात बांधकाम लाभार्थ्यांना तालुका महसूल विभागाच्या वतीने पाच ब्रास मोफत वाळूचे वाटप करण्यात येत आहे.अशातच कुरखेडा तालुक्यातील बांधकाम लाभार्थ्यांना महसूल विभागाने वाळू वितरणासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी ठरवून दिला होता.त्यामुळे काही लाभार्थ्यांना वाहतुकीचे साधन वा इतर कारणांमुळे वेळेत वाळूची उचल करणे अवघड झाले होते.सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कानी पडताच त्यांनी कुरखेडा,कोरची व इतर तालुक्यातील तहसील कार्यालयांशी संपर्क साधून बांधकाम लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळूची उचल करण्याकरीता ठराविक कालावधी ठरवून न देता सर्व लाभार्थींना वाळूचे वितरण होई पर्यंत वाळू देण्याची मागणी केली.त्यानुसार तालुका महसूल प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सर्व लाभार्थींना वाळूचे वितरण होई पर्यंत पाच ब्रास मोफत वाळू देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नाने बांधकाम लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!