Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होणार पेपरलेस...

आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होणार पेपरलेस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्याचे सूतोवाच केल्यानंतर त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू झाली आहे.यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.या ई-कॅबिनेटसाठी आवश्यक टॅबची हाताळणी आणि सॉफ्टवेअरबाबत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. देशातील जवळपास पाच राज्यांत ई-कॅबिनेटची अंमलबजावणी करण्यात आली आहे.महाराष्ट्रातही लवकरात-लवकर ही संकल्पना राबविण्याचा फडणवीस सरकारचा मानस आहे.
पारदर्शक आणि गतिमान कारभारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा संकल्प फडणवीस यांनी सत्तेत येताच केला होता.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकाही ई-कॅबिनेटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.त्यादृष्टीने विविध विभागांतील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना ई-कॅबिनेटचे प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच मंत्री कार्यालयातील अधिकारी आणि खुद्द मंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांसमोर ई-कॅबिनेटबाबत सादरीकरण करण्यात आले.राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.राज्य मंत्रिमंडळाची बैठकच ई- कॅबिनेटवर आल्यास कारभार पेपरलेस करण्यास गती मिळणार आहे.विशेषतः,यामुळे मोठ्या प्रमाणावर कागदाची बचत होणार आहे.
ई-कॅबिनेटसाठी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना टॅब वितरित केले जाणार आहेत.या टॅबमध्ये संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रस्तावांचे टिपण आणि इतर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.या टॅबसाठी एक यूआयडी क्रमांकही दिला जाणार असल्याचे समजते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!