- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम इंटर्नशिप योजना २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच १२ ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे.नोंदणी लिंक आज सायंकाळी ५ वाजतापासून सक्रिय झाली आहे; उमेदवार अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.ही योजना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोंबर २०२४ असून योजनेअंतर्गत इंटर्नशिप करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी २५ ऑक्टोंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
हायस्कूल,उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण विद्यार्थी या इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.याशिवाय ITI पास,पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक,BA,B.Sc., B.Com,BCA,BBA आणि BPharm मधून पदवी घेतलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात, परंतु पोस्ट ग्रॅज्युएट, IIT पदवीधर, NIT, IIM,राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटी पदवीधर,एमबीए,सीएस,सीए, एमबीबीएस आणि बीडीएस पदवी असलेल्या उमेदवारांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावी.
पीएम इंटर्नशिप योजना २०२४ साठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा,त्याचप्रमाणे पूर्णवेळ नोकरीत नसावेत किंवा पूर्णवेळ शिक्षणात गुंतलेले नसावेत.ऑनलाइन/डिस्टन्स लर्निंगद्वारे अभ्यास करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
योजनेअंतर्गत,उमेदवार १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप करू शकतील.पाच वर्षांत एक कोटी उमेदवारांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.इंटर्नशिप कालावधीत उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहे.
- Advertisement -

