Monday, October 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. - विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात सर्वात अगोदर स्वतःपासून करायला हवी.नाहीतर “लोका सांगे ब्रम्हज्ञान अन् स्वतः मात्र कोरडे पाषाण..!” असे व्हायला नको. यासाठी यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू असलेली हेल्मेटची सक्ती आता पोलिस दलालाही लागू करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकीने प्रवास करतांना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि जनतेसमोर पोलिस दलाने आदर्श निर्माण करावा,या उद्देशाने राज्याचे पोलिस महासंचालक(डीजीपी)सदानंत दाते यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत.पोलिस दल हे कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रमुख यंत्रणा असल्याने त्यांच्याकडून नियमांचे पालन अपेक्षित आहे.त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्याचबरोबर,एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट वापरलेला नसेल आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याची फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार असून संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,याची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत केली जाणार आहे.नियमभंगाच्या नोंदीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधी,सन्मानचिन्हे,पुरस्कार तसेच इतर सेवा सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला गडचिरोलीत ‘पेंशन अदालत’ व कार्यशाळा.. – निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी सुटणार जागेवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कोषागार कार्यालय,गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी उद्या,मंगळवार ६ ऑक्टोंबरला ‘पेंशन अदालत’आयोजित करण्यात आली...

आज भारतीय किसान संघातर्फे ट्रॅक्टर मोर्चा; चार जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-धानाला योग्य हमीभाव,प्रलंबित बोनस तातडीने द्यावा,दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके  समाविष्ट करावेत आणि धानाचे चुकारे ४८...

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!