- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-रब्बी पणन हंगाम २०२४-२५ मधील आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत रब्बी धान खरेदी करण्याकरिता पूर्वतयारी म्हणून आज,मंगळवार १५ एप्रिल पासून शेतकऱ्यांचे सातबारे व अर्ज ऑनलाइन नोंदणी होणार आहे. त्यामुळे रब्बी धान खरेदीकरिता शेतकऱ्यांनी आपले नोंदणी करून घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी आपली नोंदणी अर्ज नियोजित ठिकाणी द्यावेत, असे आवाहन देसाईगंज खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
ही लागणार कागदपत्रे👇
अर्जासोबत २०२४-२५ चालू वर्षाचा ई-पीक केलेला व रब्बी धान नोंद असलेला सातबारा,नमुना ८ अ,आधार कार्ड झेरॉक्स प्रत,बँक पासबुक झेरॉक्स प्रत, सातबारावर जास्त भोगवटदार असतील तर त्यांचे संमतीपत्र व संमतीधारकांचे साक्षांकित केलेले आधार कार्ड,सुरू मोबाइल नंबर आवश्यक आहे.
नोंदणीचे ठिकाण👇
किन्हाळा केंद्र समाविष्ट गावे किन्हाळा,मोहटोला, झरी-फरी,उसेगाव,कोकडी,तुळशी,नैनपूर व वडसा केंद्र समाविष्ट गावे वडसा,जुनी वडसा,कोंढाळा,कुरूड आदी गावे येतात.
- Advertisement -