- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा ९८ हजार ३०६ कोटी रुपये इतका असणार आहे.याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता,१२ हजार ३५५ कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत.त्यामुळे सुमारे १ लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळतील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस हे आज, रविवार १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना माध्यमांशी बोलत होते.शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन,उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन,गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत.पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे,पूर्वी जी केवळ १ लाख कोटी असायची. ५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे.यातून विविध क्षेत्रांना दिशा,गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. शेती,पशुपालन,मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे.प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल.मुंबई-पुणे,पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल.पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल.ग्रोथहबसाठी पाच हजार कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत,याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर),पुणे महानगर,नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे,असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- महाराष्ट्रासाठी काय?👇
– महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : ३७८.३८ कोटी
– महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्प : १६७.२८ कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : २८३.७७ कोटी
– महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : ३८५.७८ कोटी
– उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : २०७.१० कोटी
– शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : ६४६.२४ कोटी
– मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : ३१३.६५ कोटी
– जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : २४०.९० कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर :६,१०३ कोटी
– मुंबई मेट्रो : १७०२ कोटी
– एमयुटीपी ३ : ४६२ कोटी
– एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : १५५.३२ कोटी
– समृद्धी महामार्गावर आयटीएस : ६८०.७९ कोटी
– पुणे मेट्रो : ५१७.७४ कोटी
(केवळ मुंबई,पुण्यातील प्राथमिक आकडेवारी एकूण : १२ हजार ३५५ कोटी)
- Advertisement -

