Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरछोटीशी डुलकी ठरली जीवघेणी; अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

छोटीशी डुलकी ठरली जीवघेणी; अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कार चालवतांना चालकाला लागलेली एक छोटीशी डुलकी संपूर्ण कुटुंबासाठी जीवघेणी ठरली असून,या दुर्घटनेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली.आशालता हनुमंत कणबर्गी वय ८३ वर्षे आणि मुलगा विकेकानंद कणबर्गी वय ५६ वर्षे अशी मृतक मायलेकांची नावे आहेत.दोघेही मायलेक ठाण्याहून नागपूरच्या दिशेने आपल्या कारने नागपूर कॉरिडॉरला जात होते.पहाटेच्या वेळी प्रवासाचा थकवा आणि झोपेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि चॅनेज क्रमांक-३९/९०० जवळ मिडल लाईन मधील समोर चालत असलेल्या कंटेनरला कारची मागून धडक लागली.धडक इतकी भीषण होती की,कारचा समोरचा भाग कंटेनरच्या खाली घुसला आणि गाडीचा चक्काचूर झाला.यात कारमधील आशालता यांचा जागीच मृत्यू झाला.तर कारचालक विवेकानंद याला महामार्ग पोलीस रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस पथकातील  पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे व प्रकाश चौधरी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर समृद्धी महामार्गवरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तात्काळ दखल घेत क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!