- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अतुल लक्षमन किनकर वय ४५ वर्षे,त्यांची १६ वर्षीय मुलगी रिद्धिमा अतुल किनकर व मुलीची मैत्रीण गुंजन रमेश मेश्राम वय १६ वर्षे सर्व रा.शेडगाव,ता.समुद्रपूर, जि.वर्धा अशी मृतकांची नावे आहेत.तिघेही अधिक मासानिमित्त नदी तीरावर आंघोळीसाठी गेले असता सदरची दुर्दैवी घटना घडली.नदीत आंघोळ करत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.सदरची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.दरम्यान,पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी शोध मोहीम राबवण्यात आली.काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.घटनास्थळी एसडीएम आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर,एसडीपीओ सुशिलकुमार नायर,पीआय अनिल ठाकूर,समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर,गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली.तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
- Advertisement -

