- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-विनापरवाना रेती ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करणाऱ्यांवर तीन ठिकाणी कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिल्या कारवाईत,तुमसर पोलिसांनी तामसवाडी वैनगंगा नदी पात्रात कारवाई करून ८ लाख १ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.आरोपी चालक चंद्रमोहन यादव बनकर वय ४५ वर्षे याने मालक राजू वासुदेव बनकर वय ५२ वर्षे,रा.डोंगरला याच्या सांगण्यावरून तामसवाडी वैनगंगा नदी पात्रातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरताना मिळून आला.ही रेती तिसरा आरोपी खेमराज बाळकृष्ण रहांगडाले वय ४० वर्षे,रा.डोंगरला याच्याकडे साठवणुकीकरिता नेत होता.पोलिसांनी ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा ८ लाख १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तुमसर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या कारवाईत,बेलगाव शेतशिवार रेती घाटाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर निलेश लालचंद राघोर्ते वय २१ वर्षे रा.सुरेवाडा व मालक रोहीत दिलीप मारवाडे रा.खमारी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या रेती चोरी करताना मिळून आले.तर एमएच-३६/एल-६०९९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अर्धा ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले.कारधा पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर व दीड ब्रास रेती व असा १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
- Advertisement -

